Praniti Shinde : मोदींचा चेहरा बघा महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीतून प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीतून प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रणिती शिंदे म्हणाले की, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केली. ही लोकशाहीची निवडणूक नव्हती. ही तत्वाची लढाई नव्हती. तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार.

आपण हरलो नाही आहोत हा विजयच आहे. मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, ईव्हीएम मॅन्यूपुलेट करून निवडणुका जिंकल्याने भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com