Navi Mumbai : श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 50 हजार किलो लाडूचा प्रसाद

अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरामध्ये 50 हजार किलो ( दोन लाख )लाडूंचे वाटप प्रसाद म्हणून केले जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi

अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरामध्ये 50 हजार किलो ( दोन लाख )लाडूंचे वाटप प्रसाद म्हणून केले जाणार आहे. याशिवाय या तिन्ही शहरांमध्ये होम हवन, कीर्तन, भजन, श्रीराम कंदील, महाप्रसाद, महाआरती, हनुमान चालीसा पठण, रामरक्षा पठण, ढोल ताशा सह शोभायात्रा, ध्वजपथक सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव, मंदिरांवर रोषणाई, रथयात्रा, आतिषबाजी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या तीन शहरांमधील मंदिरांमध्ये पंचवीस हजार किलो लाडूंचे वाटप महाप्रसाद म्हणून करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com