PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडे 3 कोटींची संपत्ती, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आली आहे. मोदींकडे बहुतेक रक्कम बँकेत मुदत ठेवींच्या रुपात आहे. स्टेट बँकेत मुदत ठेवींच्या रूपात 2 कोटी 85 लाख रुपये इतके आहेत. 45 ग्रॅमची चार सोन्याची वळं असून त्यांची किंमत 2 लाख 67 हजार असल्याची माहिती आहे.

52 हजारांची रोकड त्यांच्याकडे आहे. 9 लाखांची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकीट असून, आर्थिक वर्षात 3.33 लाख प्राप्तिकर वजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पत्नीकडे असलेली संपत्तीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. शपथपत्रातील माहीतीप्रमाणे मोदींकडे घर किंवा गाडी नाही. तसेच मोदींवर एकही गुन्ह्याची नोंद नाही असे समोर आलेले आहे. काल वाराणसीमधून पंतप्रधान मोदींनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्याच्यातून ही माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com