व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार नवी मुंबईच्या दौऱ्यावर
मोदी करणार खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण
थोडक्यात
15 जानेवारीला पंतप्रधान मोदी नवी मुंबई दौऱ्यावर
मोदी करणार खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण
इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष सूर्यदास प्रभू यांची माहिती
पंतप्रधान मोदी नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईच्या खारघरमधील नव्या इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 15 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरला येणार आहेत. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष सूर्यदास प्रभू यांनी ही माहिती दिली आहे.
इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिरचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षात 9 ते 15 जानेवारी असा असणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती शनिवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेतून दिली.