PM Narendra Modi Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदानाचे अपील, मोदींचं खास मराठीत ट्विट

लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना 6 भाषांमधून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. या सहा भाषांमध्ये मराठीचाही समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com