Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

भंडारा शहरातील मुस्लीम लायबरी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठं मोठे खड्डे पडले आहे.
Published by :
Sakshi Patil

भंडारा शहरातील मुस्लीम लायबरी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठं मोठे खड्डे पडले आहे. हा महत्वाचा मार्ग असून जिल्हाधिकारी ऑफिस, पोलिस मुख्यालय, तसेच महत्वाचं कार्यालयात याच मार्गानें नागरीकांचं जाणं येणं होतं. या खड्ड्यांमुळे नागरीकांना त्रास होत आहे. अनेकदा नगर परिषद भंडारा यांना निवेदन करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी खड्ड्यात रंगोली पुरत खड्ड्यात बसून अनोखा आंदोलन केलय. एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागृत होईल काय असा प्रश्न देखिल उपस्थीत केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com