Pune : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत बदल, काही प्रमुख रस्ते राहणार बंद

माऊलींच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. उद्या पुण्यातील काही प्रमुख रस्ते देखील बंद राहणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

माऊलींच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. उद्या पुण्यातील काही प्रमुख रस्ते देखील बंद राहणार आहेत. उद्या पुण्यात दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. संध्याकाळी पुण्यामध्ये तुकोबांची पालखी आणि माऊलींची पालखी एकत्र येणार आहे.

पुण्यात उद्या आणि सोमवारी सकाळी असे सलग दिवस माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असेल. उद्या रविवारचा दिवस असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी होऊ शकते, अनेक मुंबईकर देखील पुण्याच्या दिशेने येऊ शकतात. या कारणामुळे पुण्यातील काही प्रमुख रस्ते देखील बंद राहणार असून, वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com