व्हिडिओ
Lalit Patil : 15 दिवसांपासून फरार ललित पाटील गेला कुठं?
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या साथीदारांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे.
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या साथीदारांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. पोलिसांनी मुंबई, नाशिक, पुणे आणि नगरमधील साथीदारांच्या घरांवर छापे टाकले आहेत. माफिया ललित पाटील याचे साथीदार इमरान शेख, गोलू हरीश पंत या मुंबईतील तिघाजणासह ईशान इक्बाल शेख राहुल पंडित उर्फ रोहित कुमार उर्फ अमित कुमार राहणार नाशिक त्याचबरोबर अहमदनगर मधील एका साथीदाराच्या घरावर पुणे पोलिसांची मोठी छापेमारी केल्याची माहिती आहे. ललित त्याच्या जुन्या ड्रायव्हरसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस मुंबईतील ड्रग्ज पेडलर गोलू याचाही शोध घेत असल्याची माहिती आहे.