पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या हदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे.
Published by :
Team Lokshahi

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या हदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. असे असले तरी या राजीनाम्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून राज्यपाल पुरोहीत आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रचंड तणाव होता आणि तो दिवससेंदिवस वाढतच होता. खास करुन विधिमंडळांने बहुमताने संमत केलेल्या विधेयकांवर स्वाक्षकीर करण्यावरुन हा तणाव वाढत होता. त्यामुळे राज्य सरकारसोबत बिघडलेले सबंध आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयांवर होत असलेली टीका, यांमुळे हा तडकाफडकी राजीनामा आल्याची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com