PM Narendra Modi : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो पाहायला मिळत आहेत. काही खुर्च्यांवर पंजा राहूल गांधींचे फोटो दिसून येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो पाहायला मिळत आहेत. काही खुर्च्यांवर पंजा राहूल गांधींचे फोटो दिसून येत आहे. हा प्रकार लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांनी स्टिकर्स फाडले. वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी जाहीर सभा होत आहे. त्याकरिता येथे जय्यत तयारी केली असून भाजप कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र या खुर्च्यांवर चक्क काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांच्या पंजा चिन्ह स्टिकर्स असल्याने खळबळ उडाली आहे. काही खुर्च्यांवर अर्धवट स्टिकर्स फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजा चिन्ह दिसून येत आहे. यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचे प्रचार तर सुरू नाही ना अस प्रश्न पडत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com