Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात

राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात असेल. न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात असेल. न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राहूल गांधीच्या स्वागताची कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी नावाचं वादळ ठाण्यात धडकणार आहे असे पोस्टर याठिकाणी लागलेले आहेत. ठाण्यातून पुढे यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे. राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरमधून निघाली होती आणि आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकणार आहे. आज ही यात्रा मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामध्ये येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com