Rahul Narvekar | भरत गोगावलेंच्या व्हिपबाबत राहुल नार्वेकरांची मोठी माहिती

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला.
Published by :
Team Lokshahi

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. शिंदे गटाच्या आमदारांसोबतच नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारांदेखील पात्र ठरवले आहे.

याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्र करताना व्हिप कधी काढला आणि तो योग्य वेळेत आमदारांपर्यंत पोहोचवला का? त्या व्हिपच्या विरोधात जाऊन मतदान केले का, हे पाहणे महत्वाचे आहे. भरत गोगावलेंनी व्हिप काढला असला तरी त्यांनी योग्य वेळेत आमदारांना दिला होता, याचे पुरावे नव्हते. यामुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणे शक्य नव्हते, असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com