Daund : दौंडकरांवर पाऊस रुसला; बळीराजाला जोरदार पावसाची अपेक्षा

दौंड तालुक्यात अद्यापही पाऊस दाखल झाला नाही आहे, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत
Published by :
Team Lokshahi

दौंड: राज्यात एकीकडे मुसळधार पावसाचा कहर सुरु असताना, दौंड तालुक्यावर मात्र पावसाने अवकृपा दाखविली आहे. दौंड तालुक्यात अद्यापही पाऊस दाखल झाला नाही आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

शेतात बाजरीची पेरणी केल्यानंतर जून-जुलै महिन्यांत एकही मोठा पाऊस न झाल्याने बळीराजाला पावसाची अपेक्षा लागली आहे. पाऊस पडेल या आशेवर, केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com