Raj Thackeray: मतांसाठी फुकट पैसे वाटणार का? राज ठाकरे सरकारवर बरसले
सरकारी योजनांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला प्रश्न उपस्थित केला आहे. मतांसाठी फुकट पैसे वाटणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जनता फुकटचे पैसे मागत नाही त्यांना काम द्या असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या टिकेला मात्र संजय शिरसाटांनी उत्तर दिलेलं आहे. सरकारकडे पैसा आहे तर देण्याची ही मानसिकता आहे. सरकार योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नाही असं देखील शिरसाट म्हणत आहेत.
राज ठाकरे म्हणाले, लोक कामं मागत आहेत ना ते फुकटचे पैसे नाही मागत आहेत. शेतकरी फुकटची वीज नको आहे त्यांना वीजेमध्ये खंड नको एवढच तो मागतोय. तुम्ही पहिल्यांदा या लोकांच्या मागण्या तर समजून घ्या. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही वाटेल ते फ्रीमध्ये देताय आणि फ्री म्हणजे कोणाचं आहे ते लोकांच आहे. लोक जे टॅक्स भरत आहेत तेच आहे ते असं कस करुन चालेल तुम्हाला.
यावर प्रत्युत्तर देत संजय शिरसाट म्हणाले, राजसाहेबांना कदाचित त्याची कल्पना नसेल म्हणून ते तसं बोलत आहेत. परंतू सरकारकडे पैशांची पुर्ण तरतूद केलेली आहे. एखाद्या विभागाचे काम एकवेळ हळू होईल पण लाडकी बहिण योजनेला पैसे पुरवने कमी होणार नाही.