Rajan Salvi: राजन साळवींची स्वत:साठी नाही, पण पत्नी-मुलाची अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

राजन साळवी कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन न मिळाल्यास राजन साळवींना आज अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र स्वत:ला अटकपूर्व जामीन अर्ज न घेण्यावर राजन साळवी अद्यापही ठाम आहेत.
Published by :
Team Lokshahi

राजन साळवी कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन न मिळाल्यास राजन साळवींना आज अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र स्वत:ला अटकपूर्व जामीन अर्ज न घेण्यावर राजन साळवी अद्यापही ठाम आहेत.

जिल्हा न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता पण तेव्हा राजन साळवी यांच्या कुटुंबाचे मुख्य वकिल हजर नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. एसीबीनं राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. जर आज कोर्टाने दिलासा दिला नाही तर राजन साळवी यांना अटक होण्याची शक्यता आहे, जर कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर एकूण राजन साळवी कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com