Rajan Salvi : माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे

राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यानंतर राजन साळवी यांच्याकडे साडेतीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगून एसीबीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या धाडीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. माझ्यावरचा आरोप चुकीचा असल्याचे साळवींनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आहेत त्यांना त्रास द्यायचा, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com