रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस; राम सातपुते ट्विट करत म्हणाले...

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांचे ट्विट
Published by :
Siddhi Naringrekar

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. राम सातपुते ट्विट करत म्हणाले की, भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उचल्याबद्दल @BJP4Maharashtra धन्यवाद.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दिलेल्या धमक्या याची दखल पक्षाने घेतल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहोत. पक्षाशी गद्दारी व कृतघ्नता याला माफी नाहीच. असे राम सातपुते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com