Ramdas Athawale On Ashok Chavan: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षामध्ये राहून लोकांची सेवा करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं, देशाचा विकास करणं अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि आपल्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस पक्षामध्ये राहून लोकांची सेवा करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं, देशाचा विकास करणं अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि आपल्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com