Ramesh Chennithala: काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर दाखल

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत मविआमधील जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ते आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी आता दाखल होणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत मविआमधील जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ते आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी आता दाखल होणार आहेत. मविआमधील वादाच्या संदर्भात ते आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. तर नसीम खान, भाई जगताप देखील मातोश्रीवर दाखल झाल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांसह विनायक राऊत देखील मातोश्रीवर उपस्थित असल्याच दिसत आहे.

याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, प्रादेशिक पक्षांच्या जोरावर सध्या राष्ट्रीय रकाजकारण सुरु आहे. प्रादेशिक पक्ष जर नसते, म्हणजे चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, हितेश कुमारांचा पक्ष तर मोदी आज प्रधानमंत्री होऊच शकले नसते. आज इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्षच आहेत. आमची सगळ्यांसोबत चर्चा झालेली आहे, सगळ्यांसोबत चर्चा झाल्यामुळेच आज कॉंग्रेसकडून दिल्लीच्या हाय कमांडकडून महाराष्ट्राचे प्रभावी रमेश चेन्नीथला यांना उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलेल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com