Chiplun: चिपळूणमधील राणे-ठाकरे गट राडा पूर्वनियोजित?

राड्यापूर्वीचा तो व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे. राड्यापूर्वी सळई घेऊन फिरणारा तरुण सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राड्यापूर्वीचा तो व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलेला आहे. राड्यापूर्वी सळई घेऊन फिरणारा तरुण सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडिओमधील तो तरुण नेमका कोण? तरुणाच्या हाती लोखंडी रॉड नेमका कशासाठी होता? तीन दिवसांपूर्वी चिपळूण मध्ये माजी खासदार नीलेश राणे आणि ठाकरे गटाचे आ भास्कर जाधव यांच्यात राडा झाला होता. पण हा राडा पूर्व नियोजित होता का असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कारण सदरच्या व्हिडिओमध्ये एक युवक हातात शिगा घेऊन फिरत असल्याचा दिसत आहे. तर दुसरा युवक त्याला त्या शीगा एका बाजूला ठेवण्यास सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे सदरचा राडा हा पूर्व नियोजित होता का असा सवाल उपस्थित होत आहे. चिपळूण पोलीस वेगाने तपास करत आहेत. मात्र सदरच्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com