Sangli: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपाची एंट्री, स्वबळाचा नारा देत उमेदवारी जाहीर

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत. नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणुक घडवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे. माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com