Nanded : रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको

नांदेड जिल्ह्यातील गंजगावात रस्त्यासाठी ग्रामस्थांनी केले रास्ता रोको आंदोलन
Published by :
Team Lokshahi

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गंजगावात रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. गंजगावातून रेतीच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतूक जात असते. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गावातील महिला, पुरुष मुलं-बाळ घेऊन रस्त्यावर उतरले होते.

हे आंदोलन रात्रीही सूरु होते मात्र रेती माफियाने पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयन केला आहे. तर जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com