Ratnagiri Ganpati Utsav 2023 : कोकणात बाप्पा विराजमान, पारंपारिक वाद्याच्या गजरात बाप्पाचं आगमन

वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. कोकणातल्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव.
Published by :
Team Lokshahi

वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. कोकणातल्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. आज अनेक बदल आपल्याला होताना दिसून येत आहेत. पण कोकणातला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, घरोघरी साजरा केला जातो. हे कोकणातल्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. दरम्यान पारंपारिक पद्धतीने कोकणात बाप्पाचा आगमन घरोघरी होत असून सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस, सात दिवस कोकणात हा उत्साह कायम राहणार आहे. पारंपरिक वाद्य, बाप्पाच्या नामाचा गजर करत कोकणातला प्रत्येक घरात बाप्पाचं आगमन होत आहे आणि संपूर्ण कोकणात आपणाला हेच चित्र पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com