Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून अटक

रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पिकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरू होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असे रविकांत तुपकर यांनी सांगितले होते.

रविकांत तुपकर यांचे कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरु होते. त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर रविकांत तुपकर म्हणाले की, मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध असे तुपकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com