Ravindra Chavan : मोठी बातमी : भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाणांची नियुक्ती

Ravindra Chavan : मोठी बातमी : भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाणांची नियुक्ती

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती. जे पी नड्ड यांनी दिली जबाबदारी. चव्हाण आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काम करणार.
Published by :
shweta walge
Published on

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्ड यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं ते आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरीनं ते काम करणार आहेत.

पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांनी पक्ष जो आदेश देणार त्याचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com