Ravindra Waikar : शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा ; जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट देखील सादर करण्यात आला आहे.

मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. यावर आता राजकीयवर्तुळातुन काय प्रतिक्रिया येते या कडे आता लक्ष लागलेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com