मराठी बोलण्यास नकार; बाऊन्सर्सना मनसे स्टाईलमध्ये समज

मुंबईतील दहिसरमध्ये मराठी-हिंदी भाषेवरुन वाद झाला आहे. बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी समाचार घेतला आहे.
Published by :

कल्याणमध्ये मराठी माणसाला बेदम मारहाणीची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला परप्रांतियाने मारहाण केली आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. कल्याणमध्ये शुल्लक कारणावरून अखिलेश शुक्ला या परप्रांतियाने 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून ३ मराठी माणसांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दहिसरमध्ये मराठी-हिंदी भाषेवरुन वाद समोर आला आहे.

अमराठी बाऊन्सर्सला मनसेनं दिला समज

मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी-हिंदी भाषा वादाच्या घटना घडल्या आहेत. आता दहीसरमध्ये सुद्धा मराठी-हिंदी भाषेवरुन वाद झाल्याच असच एक प्रकरण समोर आलं आहे. दहिसर येथील एका हॉटेलमध्ये मराठी माणसासोबत मराठी बोलण्यास परप्रांतीय बाऊन्सर्सनी नकार दिला. 'मराठी बोलणार नाही तुला जे करायचं ते कर' अशी आरोरावी बाऊन्सर्सनी केली. त्यानंतर मनसेने आपल्या स्टाइलने समाचार घेतला. त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाऊन्सर्सनी मनसे कार्यकर्त्यांसमोर मराठीत माफी मागितली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com