Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरण, मॉरिसच्या अंगरक्षकाला पोलीस कोठडी

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.
Published by :
Team Lokshahi

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा परवाना मिश्राच्या नावे असल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आज त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .

दरम्यान यावर अमरेंद्र मिश्रा यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे, "माझ्या नवऱ्याला फसवलं जात आहे या संपूर्ण प्रकरणात त्यांचं नाव घेतलं जात आहे" असं विधान केलंय तसेच अमरेंद्र मिश्रा यांच्या वकिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com