व्हिडिओ
Gopichand Padalkar : मंत्रिपदावरुन नाराज? गोपीचंद पडळकर म्हणाले 'मला मंत्रिपद मिळावं, ही...'
गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते मंत्रिपदाबात म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली. तिथल्या जनतेने भरघोस मतदान करुन, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करुन मला जवळपास 40 हजार मतांच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेले आहे.
आता मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. परंतु मी ज्या लोकांसाठी काम केलं. त्या लोकांच्या भावना होत्या की, मला मंत्रिपद मिळावं. परंतु पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मला मान्य आहे. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.