व्हिडिओ
Sharad Pawar Security | केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात शरद पवारांनी CentralSecurityकेंद्रासमोर ठेवल्या ‘या’ 3 अटी
शरद पवारांच्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षेच्या संदर्भात शरद पवारांच्या केंद्राला 3 अटी आहेत.
शरद पवारांच्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सुरक्षेच्या संदर्भात शरद पवारांच्या केंद्राला 3 अटी आहेत. केंद्राच्या अधिकाऱ्यासोबत दिल्लीतील बैठकीमध्ये अटी ठेवण्यात आल्या आहेत. शरद पवारांना केंद्राच्या वतीने जी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे ती शरद पवारांनी नाकारली होती आणि त्यानंतर मात्र या सुरक्षेसंदर्भात शरद पवार यांनी केंद्रासमोर 3 अटी ठेवलेल्या आहेत. शरद पवार यांनी केंद्राच्या समोर ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी नेमक्या कोणत्या त्या जाणून घ्या.
1. केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असावे.
2. कार्यालय निवासस्थानात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसावा.
3. स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसावा.