Mumbai : दादरमधील टिळक पुलाच्या रचनेमुळे रहिवासी हैराण, उड्डाणपुलामुळे रहिवाशांना त्रास?

दादर पूर्व-पश्चिम जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक पुलाचा विस्तार करण्यात येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दादर पूर्व-पश्चिम जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक पुलाचा विस्तार करण्यात येत आहे. दादरमधील टिळक पुलाच्या रचनेमुळे रहिवासी हैराण आहेत. वाहतूक कोंडीमुळे पुलाचे रुंदीकरण केलं जाणार आहे. पण टिळक पुलाचा काही भाग इमारतीच्या खिडकीलगत आला आहे.

पालिका व महारेलद्वारे याठिकाणी केबल स्टेड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. भविष्यात या उड्डाणपुलामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या रहिवाशांकडून पत्रव्यवहार करून योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com