Rohit Pawar on Sudhir Mungantiwar : 'निवडणूक धनशक्ती विरूद्ध जनशक्ती', रोहित पवारांचा चिमटा

आमदार रोहित पवार यांनी तिकीट नाकारण्याच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार चिमटा काढलाय.
Published by :
Dhanshree Shintre

आमदार रोहित पवार यांनी तिकीट नाकारण्याच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार चिमटा काढलाय. चंद्रपूर लोकसभेसाठी एक उमेदवार तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न करत होता तर एक उमेदवार तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करत होता.

त्यामुळे जो तिकिटासाठी प्रयत्न करत होता त्यालाच लोकं जिंकवतील असं म्हणत रोहित पवारांनी मुनगंटीवारांना टोला लगावला आहे. तसेच लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार आज चंद्रपूर दौऱ्यावर आले असून भद्रावती येथे एका इफ्तार पार्टीमध्ये सामील झाले होते.

रोहित पवार यांनी मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे म्हणाले की, कुठेतरी भावनिक वातावरण चंद्रपूरमध्ये झालेला आहे आणि चर्चा करत असताना काही लोकं असंही म्हणतात की प्रतिभाताई धानोरकर प्रयत्न करत होते की त्यांना लोकसभेचं तिकीट मिळावं, प्रयत्न करत असताना अनेक नेत्यांना ते भेटले आणि संघर्ष करुन त्यांना ते तिकीट भेटलं पण मुनगंटीवार साहेबांच्या बाबतीत त्यांना हे तिकीट नकोच पाहिजे होतं, त्यांना खासदारकीला जायचंच नव्हतं. मग लोकांत चर्चा अशी आहे की जर त्यांना जर खासदारकीला जायचंच नव्हतं, मग त्याच्यापेक्षा ज्यांना जायचं आहे प्रतिभताई त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेलं जास्त महत्त्वाचं आहे. पंजा ही त्यांची निशाणी आहे म्हणून तुम्हाला सांगतो की वातावरण लोकांनी इथे ताब्यात घेतलं आहे, कुठेतरी लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई या मतदारसंघात होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com