बारामतीत पैशांचा पाऊस? रोहित पवारांनी केला व्हिडिओ ट्विट

लोकसभा निवडणुकीचा आज तिसरा टप्पा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा आज तिसरा टप्पा आहे. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत अजित पवार गटावर टीका केली आहे.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस...यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा? असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com