India Vs Pakistan
India Vs PakistanTeam Lokshahi

Video: सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने कोहलीला चक्क उचललं खांद्यावर

अखेरच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा थरार टिपेला पोहोचला होता. जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले गेले होते.
Published by :
Sagar Pradhan

ज्या सामन्याकडे आज लाखो लोकांचे लक्ष लागले होते. त्या टी 20 विश्वचषकातील हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.आज क्रिकेटचा एक रोमांचक सामना पहायला मिळाला. अखेरच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा थरार टिपेला पोहोचला होता. जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले गेले होते. अखेरच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

विराट कोहलीने बाजी उलटवली. त्यानंतर जल्लोष करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने चक्क विराट कोहलीला खांद्यावर उचलून नाचताना व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com