Saamana on Congress: सामना अग्रलेखातून कॉंग्रेसला कानपिचक्या

सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा मुद्दा काँग्रेसला शोभत नाही, असे सामनामध्ये लिहले आहे. काँग्रेसने संवाद ठेवावा हीच प्रार्थना.
Published by :
Prachi Nate

सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. 'केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला शोभत नाही' असं सामनामध्ये लिहलं आहे. तसेच काँग्रेसने संवाद ठेवावा हीच प्रार्थना असं देखील सामनामध्ये लिहलं आहे. सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र आहे.

तसेच जे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. येत्या 5 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. याचपार्श्वभूमीवर एकीकडे दिल्लीत प्रचारासाठी कॉंग्रेसची रंगत वाढलेली आहे तर दुसरीकडे त्यांच्या मित्रपक्षाकडून कानपिचक्या दिल्या जात आहेत.

सामना अग्रलेखात नेमक काय लिहलं आहे?

दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकीत सामना होण्याची शक्यता... केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसला शोभत नाही. काँग्रेस 'अकेली' मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही. त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते. या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ, इंडिया आघाडीस नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रकही हवा. नाहीतर मुसळ केरात, ते होऊ द्यायचे काय याचा विचार काँग्रेसने करायला हवा. संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com