व्हिडिओ
Saif Ali Khan Update | सैफ अली खानला डिस्चार्ज; रुग्णालयातून बाहेर आल्यावर पहिली झलक
सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. चाकू हल्ल्यानंतर ४ दिवसांच्या उपचारानंतर लिलावती रुग्णालयातून सैफ बाहेर आला आहे. डिस्चार्जनंतर पोलीस जबाब नोंदवण्याची शक्यता.
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. चाकू हल्ल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस सैफचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.
अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पहाटे २-२.३० च्या सुमारास हल्ला झाला होता. अभिनेत्यावर हल्लेखोराने ६ वार केले, त्यातील वार दोन अत्यंत खोलवर झाले होते. सैफला १६ तारखेलाच तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आताच समोर आलेल्या अपडेटनुसार सैफला आज २१ जानेवारी २०२५ रोजी म्हणजेच हल्ल्यानंंतर ६ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.