Saif Ali Khan:सैफ अली खान याने रिक्षाचालक भजनलाल शर्मा याची भेट घेऊन विचारपूस केली, भेटीदरम्यान काय वार्ता झाली?

अभिनेता सैफ अली खानने रिक्षाचालक भजनलाल शर्मा याची भेट घेतली. हल्ल्यादरम्यान हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्या भजनलालची विचारपूस केली.
Published by :
Team Lokshahi

अभिनेता सैफ अली खाननं हल्ल्या दरम्यान त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षाचालक भजनलाल शर्मा याची भेट घेतली आहे. सैफ अली खानला काल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, डिस्चार्ज घेण्यापूर्वी त्याने रिक्षाचालकाची भेट घेतली आहे.

ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी भजन सिंग यांनी आपल्या रिक्षात टाकून सैफ अली खान यांना नेले लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहचवल होत. याचपार्श्वभूमीवर सैफनं सदिच्छा भेट घेत रिक्षाचालक भजनलाल शर्माची विचारपूस केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com