Kailas Gorantyal: सलीम कुत्ताचा मर्डर झाला, कैलास गोरंट्याल यांचा मोठा दावा

1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

1998 मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याची सध्या जोरदार चर्चा आहे. सलीम कुत्ताच्या पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी असल्याचा आरोप झाला आहे. त्यावरुन आता मोठा वाद सुरु असतानाच, आता तो जिवंत आहे की मृत याची चर्चा रंगली आहे. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार 1998 साली 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला आहे. रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी हे छोटा राजन चे हस्तक आहेत. त्यांनी त्याला मारला आहे. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता यांनी कुठून आणला हे माहीत नाही. सलीम कुत्ता यांच्या तीन पत्नी आहेत त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले की आमचा पती वारला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com