Sambhaji Nagar: पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला मविआचा विरोध; अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन

पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला मविआ विरोध करत आहे. संभाजीनगर विमामतळावर विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला मविआ विरोध करत आहे. संभाजीनगर विमानतळावर विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी जळगावच्या लखपती दिदी कार्यक्रमासाठी येणार आहेत. पण त्यावेळेला मविआकडून विरोध करत आंदोलन केले जाणार आहे. संभाजीनगर विमानतळावरील मातोश्री लॉनबाहेर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

मातोश्री लॉनबाहेरून विमानतळापर्यंत मानवी साखळी करण्यात आली आहे. अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, आज पंतप्रधान मोदी जळगावच्या लखपती दिदी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पण आज ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत अशा बातम्या समोर येत आहेत, आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोध आक्रमक झालेले पाहायला मिळत असून त्यांच्याकडून निषेध केला जाणार आहे तसेच पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला विरोध केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com