Sambhaji Raje On Dhananjay Munde: दोषी आहे म्हणूनच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं नाही !

संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
Published by :
Prachi Nate

संभाजीराजे यांनी बीड हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा,अशी मागण त्यांनी केली आहे. दोषी आहे म्हणूनच धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं नाही,असा दावाही संभाजीराजे यांनी केला आहे.

याचपार्श्वभूमीवर संभाजीराजे म्हणाले की, धनंजय मुंडे एवढं मोठ मोठ बोलतात मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा... मंत्रीपदाचा एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे? हे मला अजून ही कळत नाही... एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा... त्याचसोबत त्यांनी वाल्मीक कराडसोबत असलेले त्यांचे संबंध सांगावे...

जग जाहीर आहे की, त्यांनी स्वतःताचं पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुकत्यार पत्र वाल्मिक कराडला दिसल आहे. यापेक्षा आणखी काय हव... एवढ स्ट्रॉंग कनेक्शन आहे, राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे तरी देखील तुम्हाला मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचा आहे... मग तरी देखील त्यांना सरकारकडून का संरक्षण दिलं जात आहे मला माहित नाही. असं संभाजीराजे म्हणाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com