Sangali : आटपाडीमध्ये मेंढपाळांचा विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर मेंढ्यांसह मोर्चा
सांगलीच्या आटपाडी तालुक्यात मेंढपाळ पशुपालकांनी आपल्या सोळा विविध मागण्यांसाठी धनगरी ओव्या म्हणत गजिनृत्य करत हजारोच्या संख्येने मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन भव्य असा मोर्चा आटपाडी तहसीलदार कार्यालयवर काढला. आटपाडी बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाला केंद्र सरकारकडुन वार्षिक ३००० कोटी भागभांडवल मिळावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाला भारत सरकार कडुन बंद केलेली जोधपूर योजना सुरू करण्यात यावी. धनगरी ओव्या,गजिनृत्य,कैपत्य नृत्य, धनगरी गीते, ढोलवादक यांना मानधन देण्यात यावे तसेच जाचक अटी शिथिल कराव्यात. चराई अनुदान न देता सरसकट ५ वर्षांपेक्षा मोठ्या वृक्षलागवड केलेल्या वनजमिनी मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी खुल्या करण्यात याव्यात. मेंढपाळ व मेंढ्यांना विमा संरक्षण मिळावे. महाराष्ट्र सरकारने माणदेशी माडग्याळ मेंढ्यांचे प्रदर्शन देशाच्या आर्थिक राजधानीत भरवावे. अश्या विविध मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला.