संजय राठोड मंत्री, भाजपच्या चित्रा वाघ यांनी का केला विरोध

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात गेली वर्षभर चहुबाजूंनी संजय राठोड यांच्यावर आरोप झालेत...
Published by :
Team Lokshahi

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात गेली वर्षभर चहुबाजूंनी संजय राठोड यांच्यावर आरोप झालेत...ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला...त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला...सत्तातरानंतर आता हे सगळं बाजूला सारुन त्यांना क्लिनचिट मिळाली... नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपद दिलं...पण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करत नाराजी व्यक्त केली

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. एकनाथ शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते. बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.

सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंताचा प्रवास

  • वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश

  • वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष

  • आरोग्य सेवेत राठोड यांचे मोठे काम. हजारो लोकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया

  • राठोड यांनी ग्रामीण भागात शिवसेनेचे नेतृत्व उभं केलं

  • विदर्भामध्ये शिवसेना वाढवण्यात मोठा वाटा

  • 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरेंचा पराभव करत विधानसभेत

    काय आहे पूजा चव्हाण प्रकरण

  • पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यात आत्महत्या केली

  • चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरण उघड केले

  • पूजाच्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले

  • भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले

  • संजय राठोड यांना पोलिसांकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर पुन्हा मंत्री

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी आमचा कोणावर आरोप नसल्याचा जबाब पोलिसांना दिला. त्यानंतरच संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाली. परंतु भाजपमध्येच राठोड यांना विरोध आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राठोड यांना मंत्री करु नये, अशीच भूमिका घेतली होती. आता त्यांनी शपथ घेताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वच काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com