Sanjay Raut : औरंगजेबानंतर आता कंसाची निवडणुकीत एन्ट्री, संजय राऊतांकडून सत्ताधाऱ्यांना कंसाची उपमा

संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
Published by :
shweta walge

औरंगजेबानंतर आता कंसाची निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री झालीय. खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना आता थेट कंसाची उपमा दिलीय. बुलडाण्यातील सभेत बोलताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. त्यानंतर भाजपने संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. असे असताना आता संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना कंसाची उपमा दिलीय. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com