Sanjay Raut : रामावर भाजपनं टॅक्स लावलाय का?, राऊतांचा संतप्त सवाल

केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर संजय राऊतांनी टिका केली आहे.

अमित शांहांच्या आश्वासनावर ठाकरे गटाने टीका केली आहे. रामावर भाजपनं टॅक्स लावलाय का?, असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील मतदारांना असे आश्वासन दिले आहे. यावरच ठाकरे गटाने टीका केली आहे. भाजप आणि अमित शाहांनी माफी मागावी, असेही संजय रावउत यावेळी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com