भाजपच्या चरणदासांनी शिवसेनेला शिकवू नये; राऊतांचा मिश्कील टोला

शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला असून यावरुन उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
Published by  :
Team Lokshahi

शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला असून यावरुन उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले, त्यांच्यावर आमच्या नरेश म्हस्के आणि महिला आघाडीने असे जोरदार फटाके फोडले की फुसके बार यु टर्न घेऊन निघून गेले, फुसके बार वाजलेच नाहीत,असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना 50 वर्षांपासून बार उडवत आली असून शिंदे मुख्यमंत्री पदी नसतील त्यादिवशी त्यांचा बार उडेल, असे म्हणत भाजपच्या चरण दासांनी, ज्यांनी महाराष्ट्राची बेअब्रू केली. त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, असा मिश्कील टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com