Sanjay Raut On PM Modi: मोदींची कालची माफी राजकीय होती
पंतप्रधान मोदींच्या माफीवरून राऊतांनी हल्लाबोल केला आहे. मोदींची कालची माफी राजकीय होती असं संजय राऊत म्हणाले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितली असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तर मविआच्या उद्याच्या आंदोलनामध्ये कोणताही बदल होणार नाही असं ही संजय राऊत म्हणाले आहेत. मोदींनी माफी मागितली असली तरी जोडे मारो कार्यक्रम होणारचं असं संजय राऊत म्हणाले. तर मोदींना खरच दुःख होत असतं तर त्यांनी पुलवामानंतर सुद्धा जनतेची माफी मागितली असती. पुलवामामध्ये जो स्फोट झाला होता आणि त्यादरम्यान जे जवान मारले गेले होते त्याबद्दल देखील मोदींनी देशवासीयांची माफी मागितली असती असं ही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी, याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम हे असण्याचं कारण नाही. माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातील लोकांनी दिलेला दिसत आहे. पंतप्रधान यांनी मागितलेली माफी ही पुर्णपणे राजकीय स्वरुपाची आहे. या घटनेतून सुटका मिळवण्यासाठी माफी मागितली पण त्या माफीमध्ये प्रश्न सुटत नाही. मोदींनी जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून राज्य सरकारला जो जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही.