Sanjay Raut : वंचित-स्वाभिमानाला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा? राऊत म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ४८ जागांवर बैठक झाली आहे. मात्र, ३० तारखेला पुन्हा बसू, असे राऊतांनी सांगितले. तसेच, काही लोकांनी देव पाण्यात घातले होते, असा टोला राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

आमचं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना अधिकृत आमंत्रण दिलेलं आहे. सर्वच प्रमुखांशी त्यांची चर्चा झाली आहे आणि दिल्लीतील नेत्यांशी देखील चर्चा झाली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करु. त्यांची जी भूमिका तीच भूमिका देखील आमची आहे. राजू शेट्टींशी देखील चर्चा झाली आहे, ३० तारखेपर्यंत जागेसंदर्भात निश्चिती येईल, असेही राऊतांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com