Video: संजय राऊत 102 दिवसानंतर कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांनी केला जबरदस्त जल्लोष

Video: संजय राऊत 102 दिवसानंतर कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांनी केला जबरदस्त जल्लोष

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर आज संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून कोठडीत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हायकोर्टात ईडीने जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यानंतर आज पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीमुळे ठाकरे गटात राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे आज स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर गराडा घातला होता. ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com