Sanjay Shirsat: 'दोन्ही शिवसेना एकत्र येणं आता शक्य नाही'; मंत्री शिरसाठ यांचं मोठं विधान
मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेतून मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं विधान केलं आहे. मनपा निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहे. आता दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नाही. एकत्र आले तर हरकत नाही, मात्र आता हे एकत्र येणार नाही. असं म्हणत त्यांनी शिवसेना फुटीवरून ठाकरेंना निशाण्यावर धरल आहे.
संजय शिरसाठ म्हणाले की, काल मी जे वक्तव्य केलं ते मला नाही वाटत मी चुकीच काही बोललो आहे. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी काही वेगळे प्रयत्न करेन असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांना सत्तेचा मोह होता, सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. त्यांना सत्तेचा मोह होता, सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले.
उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता..सत्तेसाठी शिंदे बाहेर पडले न्हवते. त्यांना राग होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा. येणारी मनपा निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झालिये.आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाहीं. एकत्र आले तर हरकत नाही मात्र आता हे एकत्र येणार नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.