व्हिडिओ
Sanjay Shirsat on Cidco Home Prices | सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार ? संजय शिरसाट काय म्हणाले?
सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याचे संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत. मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाणार नाही यासाठी सिडकोच्या अटी शिथील होणार.
आगामी काळात सिडकोची घरे स्वस्त होणार असल्याचे संकेत सिडकोचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिले. मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाणार नाही यासाठी सिडकोच्या काही जाचक अटी शिथील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सिडकोची घरे फारच महाग आहेत, अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती. त्यावरच आता शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी आगामी काळात सिडकोची घरे स्वत होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
शिरसाट सध्या सिडकोचे अद्यक्ष आहेत. त्यामुळे सिडकोची महागडी घरे आणि त्याबाबत लोकांची तक्रार याविषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. तसेच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.